जळगावच्या गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई

जळगाव : जळगाव शहरातील विविध पोलिस स्टेशनला गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मयुर उर्फ विक्की दिलीप अलोणे असे एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या मयुर अलोणे याच्याविरुद्ध रामानंद पोलिस स्टेशनसह जळगांव शहर, भुसावळ बाजारपेठ व शनीपेठ पोलीस स्टेशनला एकुण सह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

खूनाचा प्रयत्न करणे, शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन करणे, सशस्त्र दरोडा घालणे, सार्वजनिक जागी जुगार खेळणे व लोकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करणे, गंभीर दुखापत करणे, शस्त्रानिशी गंभीर दुखापत करणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे, शासन व पोलीसांकडून करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणे आदी स्वरुपाचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. किसनराव नजनपाटील, रामानंद नगर पोलिस निरीक्षकांसह पोहेकॉ संजय सपकाळे, पोहेकॉ सुशिल चौधरी, पोहेकॉ सुनिल दामोदरे (स्थानिक गुन्हे शाखा जळगांव) पोना  रेवानंद साळुखे, पोना  हेमंत कळसकर, पोना विनोद सुर्यवंशी, पोकॉ रविंद्र चौधरी, पोकॉ उमेश पवार, पोकॉ जुलालसिंग परदेशी, पोकॉ इरफान मलिक, पोकॉ किरण पाटील व स्थानिक गुन्हे शाखा पोकॉ ईश्वर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. मयुर अलोणे याची मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे रवानगी करण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here