दोन लाखांची रोकड जबरीने हिसकावून नेली – दुचाकीवरील दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : रस्त्याने पायी जाणा-या जेष्ठ नागरिकाच्या हातातील दोन लाख रुपयांची रोकड असलेली कापडी पिशवी जबरीने हिसकावून पळून जाणा-या मोटार सायकलवरील दोघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन लाख रुपये रोख, बॅंकेचे पासबुक आणि चेकबुक असा कापडी पिशवीतील ऐवज चोरट्यांकडून लंपास करण्यात आला आहे.

भगवान विश्वनाथ पाटील हे पिंप्री पंचम ता. मुक्ताईनगर येथील जेष्ठ नागरिक रोख रकमेची पिशवी घेऊन जात असतांना बोदवड चौफुलीनजीक मोटार सायकलवर आलेल्या दोघांकडून हा जबरी चोरीचा प्रकार घडला. रोकड हिसकावणारे दोघे चोरटे नंतर मुक्ताईनगर शहराच्या दिशेने परिवर्तन चौकाकडे निघून गेले. पोलिस उप निरीक्षक राहुल बोरकर पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here