पोलिसासोबत हुज्जतबाजी – दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : ग्रामपंचायतीचे मतदान सुरु असतांना गोंधळ घालून सार्वजनीक शांततेचा भंग करणा-यांना तसेच समजावण्यास गेलेल्या पोलिसासोबत हुज्जत घालून गणवेशाची कॉलर पकडणा-या दोघांविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष दगडू जंजाळे आणि राहुल दगडू जंजाळे अशी साकळी ता. यावल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

संतोष जंजाळे व राहुल जंजाळे हे दोघे यावल तालुक्यातील साकळी येथे कुरेशी वाड्याच्या जवळ सार्वजनीक जागी सार्वजनीक शांततेचा भंग करुन आरडाओरड करत होते. त्याठिकाणी हे.कॉ. राजेंद्र पवार हे त्यांना समजावण्यास गेले. या ठिकाणी मतदान सुरु असून तुम्ही शांततेत निघून जा असे दोघांना सांगण्यात आले. मात्र दोघांना हे.कॉ. पवार यांच्या बोलण्याचा राग आला. दोघांनी पवार यांच्याशी अरेरावी करत त्यांच्या गणवेशाची कॉलर पकडून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरिक्षक साळुंखे करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here