डबलसीट बसलेल्या वनरक्षक महिलेचा विनयभंग

जळगाव : मोटार सायकलवर डबलसीट बसलेल्या वनरक्षक महिलेच्या छातीला  जाणूनबुजून धक्का मारुन स्पर्श करण्यासह अश्लिल वक्तव्य केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिस पोलिस स्टेशनला एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा येथील रहिवासी व्यक्तीने एका वनरक्षक महिलेस आपल्या मोटार सायकलवर डबलसिट बसवून जाणून बुजून खड्ड्यातून वाहन नेले. खड्ड्यातून मोटार सायकल गेल्यानंतर मॅडम तुम्हाला कसे वाटते असा अश्लिल प्रश्न त्याने केला. याशिवाय समोरुन स्पर्श झाल्यावर कसे वाटते असा पुन्हा प्रश्न केला. याशिवाय जाणूनबुजून मागे सरकून पाठीचा धक्का महिलेच्या अंगाला मारुन स्पर्श केला. या प्रकारामुळे महिलेच्या मनात लज्जा निर्माण झाली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला वनरक्षक महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधीताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ज्ञानेश्वर जवागे करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here