पत्नीला शिवीगाळ करणा-याची हत्या करणा-यास जन्मठेप

जळगाव : पत्नीला शिवीगाळ केली म्हणून रागाच्या भरात एकाचा पट्ट्याने गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लहू अशोक भिल (29, रा. अकुलखेडा, ता.चोपडा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्या. पी. आर. चौधरी यांनी हा निकाल दिला आहे.

2 ऑक्टोबर 2022 रोजी दिनेश वेरसिंग सस्ते (३०, रा. पिसनावल ता. सेंधवा) व लहू भिल हे दोघे जण अकुलखेड़ा गावात समाधान बैसाणे यांच्याकडे बसले होते. दोघांनी सोबत मद्यप्राशन केले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. वादाच्या वेळी दिनेश याने लहूच्या पत्नीला शिवीगाळ केली होती. संतापाच्या भरात लहू याने पट्ट्याने गळा आवळून दिनेशच्या गुप्तांगावर लाथा मारल्या व त्यात तो जागीच मरण पावला होता.दिनेशचा भाऊ दिलीप सस्ते याच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन पोलिस निरीक्षकांसह  प्रदीप राजपूत यांनी यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास केला. त्यात हा खून लहू भिल याने केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान फरार आरोपी लहू भिल फरार झाला होता. पोलिस पथकाने त्याला त्याची सासुरवाडी अंबाडे (ता. चोपडा) येथून अटक केली होती. सरकारी वकील राजेंद्र चौधरी यांनी न्यायालयात याप्रकरणी युक्तिवाद केला. त्यात प्रत्यक्ष साक्षीदार मुन्ना पवार आणि डॉ. चंद्रहास पाटील यांची साक्ष ग्राह्य मानण्यात आली. आरोपी लहू भिल यास जन्मठेपेची शिक्षा व पाचशे  रुपये दंड आकारण्यात आला. दंड न भरल्यास पंधरा दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली. अटकेपासून आरोपी कारागृहात होता. पैरवी अधिकारी म्हणून उदयसिंग साळुंखे, हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर व अतुल पाटील यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here