धावत्या रेल्वेतून पडलेल्या तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन

जळगाव : जळगाव ते शिरसोली दरम्यान आज 19 नोव्हेंबरच्या सकाळी अप रेल्वे लाईनवर खांब क्रमांक 413-2 ते 4 दरम्यान एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून हा इसम पडला असून त्याच्या खिशात निजामुद्दीन ते कल्याण अशा प्रवासाचे जनरल तिकीट मिळून आले आहे.

सध्या रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्यामुळे कदाचीत तोल जावून तो पडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्याने आत्महत्या देखील केली असण्याची दुसरी शक्यता वर्तवली जात आहे. मरण पावलेल्या पुरुषाचा मृतदेह जळगाव सामान्य रुग्णालयात ओळख पटवण्याकामी ठेवण्यात आला आहे.

शरीराने मजबूत, चेहरा गोल, रंग गोरा, उंची पाच फूट, अंगात काळ्या रंगाचे फुल बाह्यांचे स्वेटर वजा टी शर्ट व पांढऱ्या रंगाचे फुल बाह्यांचे शर्ट व पायात निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट असे मयताचे व त्याच्या पेहरावाचे वर्णन आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याकामी अथवा त्याच्या नातेवाईकांची कुणाला काही माहिती मिळाल्यास जळगाव तालुका पोलिस स्टेशनला 0257-2253002 अथवा  पो.हे.कॉ. अनिल मोरे यांच्याशी 9823089786 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here