बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी, दहा लाखांची खंडणी — सारिका सोनवणेंच्या पोलिस कोठडीची झाली मांडणी

नाशिक : बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासह आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणा-या नाशिकच्या कृषी सहायक महिलेस दहा लाख रुपयांची खंडणी उकळतांना गंगापूर नाशिक पोलिसांनी सापळा रचून तिला तिच्या मुलासह अटक केली आहे. सारिका सोनवणे असे कृषी सहायक महिलेचे तर मोहित सोनवणे असे तिच्या मुलाचे नाव आहे. दोघे सध्या नाशिक गंगापूर  पोलिसांच्या कस्टडीत आहेत.  

दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पिठाच्या विश्वस्तांकडून दहा लाख रुपयांची खंडणी घेतांना सारिका सोनवणे या महिलेस अटक करण्यात आली असली तरी आतापर्यंत या महिलेने एक कोटीहून अधिक रक्कम उकळल्याचे म्हटले जात आहे. गंगापूर पोलिस स्टेशनला याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दिंडोरी येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक पिठाचे विश्वस्त निंबा शिरसाठ यांच्याकडून आतापर्यंत एक कोटी 5 लाख रुपये उकळल्याची फिर्याद दाखल झाली आहे.

सारिका सोनवणे आणि निंबा शिरसाट हे दोघेजण देवळा तालुक्यातील रहीवासी असून त्यांची सन 2014 मधे ओळख झाली. ओळखीचा आणि जवळीक निर्माण झाल्याचा फायदा घेत सारिका शिरसाठ यांनी निंबा शिरसाठ यांच्याकडून विविध कारणे पुढे करुन सन 2019 मधे सुरुवातीला पंचवीस लाख रुपये घेतले. दरम्यानच्या कालावधीत सोनवणे यांच्याकडून शिरसाठ यांना मोबाईलमधील काही आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवण्यात आले. या व्हिडीओच्या बळावर ते व्हायरल करण्याची धमकी देत सारिका सोनवणे यांनी निंबा शिरसाठ यांच्याकडे विस कोटी रुपयांची मागणी केली. समाजातील आपली इज्जत या मुद्द्याला घाबरुन निंबा शिरसाठ यांनी सारिका शिरसाठ यांना पन्नास लाख रुपये दिल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर देखील 10 कोटी 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पाणी डोक्यावरुन जात असल्याचे बघून श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक पिठाचे विश्वस्त निंबा शिरसाठ यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. स्वामी समर्थ सेवेक-यांकडून देखील सारिका सोनवणे यांनी लाखो रुपये जमा केल्याचे म्हटले जात आहे. स्वामी समर्थ अध्यात्मिक पिठाचे विश्वस्त आणि सेवेकरी या महिलेच्या मोहात आणि जाळ्यात कसे अडकले हा एक चर्चेचा विषय या निमित्ताने झाला आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here