नवी दिल्ली : केंद्र सरकार हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडमधील (एचएएल) आपली भागीदारी विकणार आहे. ऑफर फॉर सेल अर्थात ओएफसच्या माध्यमातून सरकार एचएएलमधील १० टक्के भाग विकणार आहे. ओएफएससाठी फ्लोअर प्राईस १००१ रुपये प्रति शेयर एवढी आहे. नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ओएफएस आजपासून खुला होणार आहे.एचएएल ही नवरत्न कंपनी आहे. जून २००७ साली एचएएलला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला आहे.
उत्पादन मूल्याच्या दृष्टीने एचएएल संरक्षण उद्योगातील सर्वात मोठी सरकारी कंपनी आहे. एचएएल अनेक प्रकारची उत्पादनांची निर्मिती करते. या व्यतिरिक्त उत्पादनाची डिझाईन्स, देखभाल, दुरुस्तीची कामेदेखील केली जातात. या कंपनीने आजपावेतो अनेक हेलिकॉप्टर्स, विमानं व त्याच्या स्पेअर पार्ट्चे उत्पादन केले आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या बोली लावल्यानंतर एकुण बोलीच्या प्रस्तावांची मोजणी होते. त्यातून किती इश्यु सबस्क्राईब झाला हे पाहिले जाते. त्यानंतर अलॉटमेंटची प्रक्रिया सुरु होते.