कुत्र्यांपासून बचाव करतांना अपघाती मृत्यूप्रकरणी गुन्हा  

जळगाव : मोटार सायकल चालवतांना भुंकणारी कुत्री मागे लागल्याने वाहन रस्त्याच्या कडेला घेतांना उस वाहतुकीच्या लोखंडी गाडीस धडक लागून एकाचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेत मयताच्या मोटार सायकलचे देखील नुकसान झाले. या घटनेप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला प्राणांकीत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत काशिनाथ माळी (रा. गुढे ता.भडगाव ) असे मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. कोळगाव गुढे रस्त्यावर 19 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटने प्रकरणी 25 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार पांडुरंग सोनवणे पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here