बनावट दस्तावेज प्रकरणी विजय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा

जळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या शैक्षणिक संस्थेत अध्यक्ष किंवा संचालक नसतांना देखील या संस्थेच्या संचालक मंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने तसेच संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासवून संस्थेच्या लेटरहेडवर खोट्या व बनावट मजकुराचे अर्ज करुन, सह्या करुन दस्तावेज तयार केल्याच्या आरोपाखाली जिल्हापेठ पोलिस स्टेशनला विजय भास्कर पाटील (रा. दीक्षित वाडी जळगाव ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश रणजीत भोईटे (रा. भोईटे नगर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर दस्तावेज बनावट असतांना ते खरे भासवून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या कार्यालयात सादर केला असल्याचे म्हटले आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गु.र.न. 431/23 भा.द.वि. 465, 471 नुसार दाखल या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. मिरा देशमुख करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here