जळगाव जिल्ह्यातून पाच गुन्हेगार हद्दपार

जळगाव : टोळीने गुन्हे करणा-या पाच जणांविरुद्ध जळगाव जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. हितेश संतोष शिंदे या टोळी प्रमुखासह इतर सदस्य  संतोष उर्फ जांगो रमेश शिंदे, आकाश उर्फ नागतोडया संजय मराठे, सुमीत उर्फ गोल्या संजय मराठे आणि संजय देवचंद मराठे (सर्व रा. चौगुले प्लॉट कांचन नगर जळगांव) अशी हद्दपारीचीकारवाई करण्यात आलेल्या सर्वांची नावे आहेत.

या सर्वांविरुद्ध शनिपेठ, जिल्हा पेठ, एमआयडीसी, जळगांव शहर आदी पोलीस स्टेशनला जबरी चोरी, प्राणघातक हल्ला, चोरी, दंगल, दुखापत, घातक हत्यार बाळगणे, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी, आदेशाचे उल्लघन अशा विविध सदराखाली एकुण सात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

या प्रस्तावाच्या चौकशीअंती पाचही गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जळगाव जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे पो.निरी. किसनराव नजनपाटील यांनी व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here