मोहाला बळी पडलेल्या डॉक्टरची साडे बारा लाखात फसवणूक

जळगाव : ऑनलाईन फोटोंना लाईक करण्याचे टास्क हाती घेतल्यानंतर सुरुवातीला पैसे मिळत गेले. सुरुवातीला पैसे मिळत गेल्याने पैशांचा लोभ वाढत गेला. त्यानंतर जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी रक्कम गुंतवून 12 लाख 42 हजार 370 रुपयात फसवणूक झाल्यानंतर संबंधित डॉक्टरने जळगाव सायबर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे संबंधीत टेलिग्राम खातेधारका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव सामान्य रुग्णालय कॅंम्पस परिसरात राहणा-या डॉक्टरच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. डॉ. प्रणव परशराम सामृतवार या 28 वर्षाच्या तरुण डॉक्टरच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.  9 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत डॉ. प्रणव सामृतवार यांनी एका टेलीग्राम गृपच्या फोटोंना लाईक करण्याचे टास्क हाती घेतले. सुरुवातीला फोटोंना लाईक करण्याच्या कामाच्या मोबदल्यात त्यांना 9150 रुपयांचा मोबदला मिळाला. विश्वास संपादन झाल्यानंतर पलीकडून त्यांना अधिकाधिक रक्कम गुंतवल्यास अधिकाधिक रक्कम मिळेल असे प्रलोभन दाखवण्यात आले. त्या प्रलोभलाना बळी पडून तरुण डॉक्टर महोदयांनी रक्कम गुंतवण्याचे काम सुरु केले. त्यात त्यांची लाखो रुपयात फसवणूक झाली. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here