पोलिस अधिका-यावरील हल्ल्याप्रकरणी सात अटकेत

जळगाव : गोवंश जातीच्या पशुधनाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केल्याचा राग आल्याने दहा ते पंचरा जणांनी पोलिस अधिका-यावर हल्ला केल्याची घटना चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीत घडली. या घटने प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे व त्यांचे सहकारी हेकॉ संतोष पारधी यांना मारहाणीसह ठार मारण्याची धमकी जमावाने दिली.

चोपडा शहरातून जाणा-या जुन्या यावल रस्त्यावर शुक्रवारी रात्री अवैध पशुधनाची वाहतुक करणा-यांविरुद्ध चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई नंतर साने गुरुजी वसाहतीमधील जमाव पोलिस स्टेशनला आला. आपल्याविरुद्ध कारवाई का केली याची जमावाने पोलिसांना विचारणा केली. पोलिसांनी त्यांना परतवून लावल्यानंतर स.पो.नि. सावळे व हे.कॉ. पारधी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असतांना जमावाने त्यांची अडवणूक केली. स.पो.नि. अजित सावळे यांना लोखंडी पट्ट्याने जबर मारहाण करण्यात आली. हे.कॉ. पारधी यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी जमावाने दिली. याप्रकरणी निष्पन्न झालेल्या दहा आरोपींपैकी सात जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

शेख सऊद शेख सलीम कुरेशी, शेख सलीम ऊर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी, जियाउद्दीन गया सुदिन काझी, शेख इब्राहिम शेख हमीद कुरेशी, शेख नाझीम शेख युनूस शोएब सलीम कुरेशी, शेख मंजूर शेख मकसुद, मजहर सय्यद जहांगीर यांचा अटकेत समावेश असून फरार आरोपींचा शोध सुरु आहे. अटकेतील आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here