चार लाखांची खंडणी मागणा-या प्रेयसीविरुद्ध गुन्हा

जळगाव : सुरुवातीला इन्स्टाग्रामवर ओळख, ओळखीचे रुपांतर प्रेमात नंतर लग्नासाठी तगादा व सर्वात शेवटी चार लाख रुपयांच्या खंडणीची मागणी असा प्रवास घडल्याने वैतागलेल्या प्रियकराने किटकनाशक औषध प्राशन करुन जीव देण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय उपचार घेणा-या प्रियकराने दिलेल्या जवाबानुसार प्रेयसी व तिला चिथावणी देणारी अशा दोघींविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर राजेंद्र कांडेलकर हा चिखली ता. मुक्ताईनगर येथील तरुण खासगी नोकरदार आहे. त्याची एका तरुणीसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. गेल्या एक वर्षापासून दोघांच्या प्रेमाचा प्रवास सुरु होता. नंतर ती सागरकडे लग्नाचा तगादा करु लागली. लग्न कर नाही तर मला चार लाख रुपये दे. नाही दिल्यास मी तुझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करेन अशी ती त्याला धमकी देऊ लागली. त्या तरुणीने बोलावल्यानुसार सागर कांडेलकर हा तिला भेटण्यासाठी आला असता तिच्यासोबत एक सहकारी होती. तिने त्या तरुणीस सागरला चार लाख रुपयांची खंडणी मागण्यास चिथावणी दिली.

कथित तरुणीच्या वारंवार फोनवर धमक्यांना वैतागून सागर कांडेलकर याने किटकनाशक औषध प्राशन करुन घेतले. मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असतांना त्याने पोलिसांना जवाब दिला. त्याच्या जवाबानुसार मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला दोघींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार रघुनाथ पवार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here