लग्नाला विरोध आणि जुन्या वादाची परिणीती झाली खूनात

crimeduniya
[email protected]

जळगाव : पुतणीचे तरुणासोबत ठरलेल्या लग्नाला विरोध आणी जुना वाद या कारणावरुन लग्न ठरलेल्या भावी वर – तरुणाचा खून केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला एकुण पाच जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण बळीराम सोनवणे (रा. समता नगर जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चॉपरचा वापर झालेल्या या घटनेत आशिष संजय सोनवणे आणि गोकुळ बळीराम सोनवणे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील समता नगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे समतानगर परिसरासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. सोनु आढाळे, पप्पु आढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड आणि योद्ध्या उर्फ पिंट्या शिरसाठ अशा पाच जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला खून, खूनाचा प्रयत्न (प्राणघातक हल्ला) आणि संगनमत अशा कलमाखाली गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. या घटनेतील मयत अरुण बळीराम सोनवणे या तरुणासोबत योद्ध्या उर्फ पिंट्या याच्या पुतणीचे लग्न ठरले होते. या लग्नास योद्ध्या शिरसाठ याचा विरोध होता. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here