कोयता आणि चॉपर बाळगणा-याविरुद्ध गुन्हा

जळगाव : विना परवाना कोयता आणि चॉपर बाळगणा-याविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश रामेश्वर राठोड असे रामेश्वर कॉलनी भागातील रहिवासी तरुणाविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोयता आणि चॉपर आपल्या कब्जात बाळगतांना तो नेरी नाका स्मशान भुमी परिसरात पोलिसांना आढळून आला. या घटनेप्रकरणी पो.कॉ. मुकुंद गंगावणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत धनके करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here