प्राध्यापिकेसोबत वेळोवेळी शरीरसंबंध ठेवणा-याविरुद्ध गुन्हा

जळगाव : अमळनेर तालुक्यातील एकाच गावात राहणा-या दोघांची ओळख झाली. दोघांचे ओळखीचे रुपांतर सहवासात आणि सहवासाचे रुपांतर प्रेमात झाले. हळूहळू प्रेमाचे रुपांतर एकमेकांसोबत लग्न करण्याचे वचन देण्याघेण्यात झाले. बघता बघता दोघांचे प्रेम बहरत गेले आणि दोघे शरीराने एक झाले.

अमळनेर तालुक्यातील एक प्राध्यापिका त्याच गावात राहणा-या मात्र नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यात खासगी नोकरी करणा-या तरुणाच्या प्रेमात पडली. गेल्या दोन वर्षापासून दोघांची लव्ह स्टोरी सुरु होती. तो अधूनमधून अमळनेर येथे तिला भेटण्यासाठी येत होता. अमळनेर तालुक्याच्या गावातून ती प्राध्यापिका त्याला भेटण्यासाठी अमळनेर येथे येत होती. गेल्या सहा महिन्यांपासून तो तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शरीर संबंध ठेवत होता. मात्र नंतर त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने अमळनेर पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद दाखल दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक भगवान शिरसाठ करत आहेत.        

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here