डॉक्टर महिलेचा फोटो काढून विनयभंग – रिक्षा चालकास अटक

जळगाव : डॉक्टर महिलेसोबत गेल्या काही महिन्यापासून जवळीक निर्माण करण्याचा  प्रयत्न करणा-या रिक्षा चालकाविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रईस असे शिवाजी नगर परिसरात राहणा-या रिक्षा चालकाचे नाव आहे.

रईस नावाच्या रिक्षा चालकाने एका डॉक्टर महिलेसोबत गेल्या काही महिन्यांपासून जवळीक साधण्याचा प्रयत्न चालवला. तसेच रईस याने या महिला डॉक्टरचा वेळोवेळी पाठलाग करुन त्याच्या मोबाईलमधे तिचे फोटो देखील काढले. त्याच्या या कृत्यामुळे महिला डॉक्टरच्या मनात लज्जा निर्माण झाली. महिला डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिसकर्मी अश्विनी इंगळे करत आहेत. रईस यास अटक करण्यात आली आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here