जळगाव : चोपडा येथील शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात 50 लाख 67 हजार 893 रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयात काम करणारा असिस्टंट अकाऊंटंट समाधान दत्तात्रय पाटील याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा येथील विजय नारायण बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समाधान पाटील याने सान 2014 ते सान 2022 या कालावधीत संस्थेत विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असलेला डाटा, त्यांच्याकडून घेतलेल्या फीबाबतची माहिती ठेवण्यासाठी वापरण्यात येणा-या सॉफ्टवेअर मध्ये स्वत:च्या नावाचा युझर आयडी पासवर्डसह इतरांच्या युझर आयडी पासवर्ड वापरुन 343 विद्यार्थ्यांकडून फी म्हणून पैसे घेऊन त्यांना स्वाक्षरी करून पैसे घेतल्याची पावती देऊन त्याची कॅश बुक मध्ये नोंद न करता एकूण 50 लाख 67 हजार 893 रूपयांची फसवणूक केली असायाचे महतले आहे. या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. संतोष चव्हाण करत आहेत.