पोलिस स्पोर्टस अकॅडमीच्या स्केटींग खेळाडूंचे यश

जळगाव : स्टेअर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धा नुकत्याच पुणे येथे उत्साहात झाल्या. राज्यातील तिनशे स्केटींग खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीच्या 20 स्केटींग खेळाडूंनी सहभाग घेतला. पोलिस स्पोर्टस अकॅडमीतील पुर्वेश पुराणिक, प्रज्ञेश कासार, मयंक ठाकरे, निर्णय भावसार, लावण्या पुराणिक, मानसी सूर्यवंशी, मोनीश वाघदे, मानसी चौधरी, तेजस्विनी सोनवणे, शोएब सय्यद या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले. उपविजेता खेळाडूंमधे कल्पेश थोरात, रुपक चौधरी, शादाब सय्यद, वंश पवार, अनिकेत कुलकर्णी, उर्वशी बोरणारे, विनीत महाजन, सक्षम बाऊस्कर, तेजल सुर्यवंशी ,आर्यन चौधरी आदींचा सहभाग आहे.  

विजेत्या खेळाडूंचे जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, पोलिस उप अधिक्षक संदीप गावित, पोलिसा उप अधिक्षक (गृह) रामकृष्ण कुंभार, राखीव पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, वेल्फेअर पोलीस उप निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उप निरीक्षक रावसाहेब गायकवाड आदींनी कौतुक केले. विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक  जागृती काळे – महाजन, अश्विनी निकम – जंजाळे, उज्वला कासार, स्वीटी गायकवाड, वैष्णवी आदींचे मार्गदर्शन लाभले.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here