जळगाव – महिला व बालकल्याण आयुक्तांकडे विविध गंभीर स्वरुपाच्या तक्रारींचे निवेदन सादर केल्यानंतर देखील त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे 19 जानेवारीपासून महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे राज्य उपाध्यक्ष अॅड. दिपक सपकाळे बेमुदत साखळी आंदोलन करणार आहेत. महिला व बालकल्याण विभागाने या संदर्भात योग्य ती दखल घ्यावी असे अॅड. दिपक सपकाळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती देवयानी गोविंदवार, सदस्य श्रीमती विद्या बोरणार, सदस्य संदिप पाटील या तिघांचे तात्काळ निलबंन करण्यात यावे. या तिघांची शासन स्तरावर कोणत्याही पदावर नियुक्ती करण्यात येऊ नये. बाल कल्याण समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ इंगळे (अधिवक्ता उच्च न्यायालय, मुंबई), राज्य कार्याध्यक्ष ॲड. सुनिल देवरे हे मुख्यमंत्री व महिला व बालविकास मंत्री यांची भेट घेणार आहेत.