पोलिस कर्मचारी हत्येप्रकरणी फेटाळला संशयीताचा जामीन

On: February 22, 2024 9:58 AM

जळगाव : मुंबई पोलिस दलाचा पोलिस कर्मचारी शुभम अगोणे याची चाळीसगाव येथे क्रिकेटच्या जय पराभवातून झालेल्या वादातून हत्या झाली होती. या घटनेप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल आहे. या हत्येप्रकरणी मुख्य संशयीत आरोपी अण्णा उर्फ आनंदा चिंधा कोळी याचा अटकपुर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

संशयीत आरोपी अण्णा कोळी याने जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावर न्या. मोहीते यांच्या न्यायालयात कामकाज झाले. न्या. मोहिते यांच्या न्यायालयाने मुख्य संशयीत आरोपी अण्णा कोळी याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. याप्रकरणी सरकारपक्षाच्या वतीने अ‍ॅड. पंढरीनाथ पवार यांनी बाजू मांडली. संशयीत आरोपीच्या बाजूने अ‍ॅड. प्रकाश पाटील यांनी तर फिर्यादी पक्षाकडून कैलास आगोणे यांनी बाजू मांडली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment