रेल्वेत बेदम मारहाण – तरुणाच्या मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा

नाशिक : मनमाड रेल्वे स्टेशनवर पंजाब मेलच्या जनरल बोगीत तरुणाला बेदम मारहाण करत बाहेर फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेत मारहाण करणा-या अनोळखी तरुणाविरुद्ध मनमाड पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या दरम्यान ही घटना घडली होती.

अजयकुमार शामसुंदर साहू (मध्यप्रदेश) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार मयत रोहीतकुमार मुकेश गोस्वामी याच्या खूनाचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहीतकुमार गोस्वामी याने आपला मोबाईल चोरी केल्याचा आरोप करुन हल्लेखोर अज्ञात संशयीत तरुणाने त्याला लाथाबुक्क्यांनी रेल्वे बोगीत बेदम मारहाण केली होती. त्यानंतर बोगीतून बाहेर फेकून दिले. फिर्यादी अजयकुमार साहू याने हल्लेखोर तरुणाला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला देखील हल्लेखोर तरुणाने शिवीगाळ केली होती. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. लांडगे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here