वेश्या व्यवसाय चालवणा-या ब-हाटे दाम्पत्यास अटक

जळगाव : “माईंड अ‍ॅंड बॉडी स्किन केअर स्पा” या नावाच्या आडून भुसावळ शहरात कुंटणखाना चालवणा-या ब-हाटे दाम्पत्यास उप विभागीय पोलिस अधिका-यांच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत ब-हाटे दाम्पत्यास अटक  करण्यात आली  असून सहा तरुणींची सुटका करण्यात आली आहे. विशाल शांताराम ब-हाटे आणि पल्लवी विशाल ब-हाटे असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपी असलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

भुसावळ शहरातील महेशनगरात हा वेश्या व्यवसायाचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सर्रासपणे सुरु होता. या प्रकाराची कुणकुण उप विभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना लागली होती. त्या माहितीच्या आधारे सुरुवातीला खात्री करण्यात आली. खात्री पटल्यानंतर याठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत सर्व प्रकार उघडकीस आला. “माईंड अ‍ॅंड बॉडी स्किन केअर स्पा” या नावाने या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे धाडीत उघडकीस आले.

संशयित विशाल शांताराम बन्हाटे आणि पल्लवी विशाल बन्हाटे या दाम्पत्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम (पीटा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या अख्त्यारीत भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण, एएसआय प्रदीप पाटील, एएसआय शालिनी वलके, हवालदार नंदकिशोर सोनवणे, शिपाई अश्विनी जोगी यांच्या पथकाने या कारवईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here