पाळधी व रामानंद नगर नुतन पोलीस स्टेशन इमारत वास्तूचे भूमीपूजन

जळगाव : – पोलीसांच्या कामकाजाचे स्वरुप दिवसेंदिवस विस्तारत असून त्यासाठी आधुनिक यंत्रणा, सुसज्ज कार्यालय, अत्याधुनिक साधन सामुग्री काळाची गरज झाली आहे. त्यासाठीच रामानंद आणि पाळधी या दोन नविन पोलीस स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमिकरणाला प्राथमिकता देण्यात आली असून इमारत, वाहने इत्यादीसाठी जिल्हा वार्षिक नियोजनमधून 28 कोटी एवढा निधी देण्यात आल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज सांगितले.

पाळधी व रामानंद नगर  येथील नविन पोलीस स्टेशन इमारत बांधकामाचे  भूमिपूजन आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे,  नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दतात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर,  जळगाव अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सचिन शिरसाठ, सा.बा.चे कार्यकारी अभियंता  गिरीश सुर्यवंशी, राजू परदेशी, प्रांजळ पाटील, उप अभियंता एस.डी. पाटील,  योगेश अहिरे, पाळधी बु. चे सरपंच विजय सिंग पाटील, उपसरपंच राहुल ठाकरे, पाळधी खु. चे सरपंच लक्ष्मीबाई कोळी, उपसरपंच भारती पाटील, सरीता कोल्हे – माळी, आशुतोष पाटील, ग्राम विकास अधिकारी पाठक, सचिन पवार, संजय पाटील आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. दीपक पवार यांनी केले. प्रास्ताविकात पोलीस उपअधिक्षक सुनील नंदवाडकर यांनी नवीन पोलीस स्टेशन बांधकाम बाबत सविस्तर महिती विषद केली.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here