पोलिस कोठडीतील संशयीताची आत्महत्या

जळगाव : पोलिस कोठडीतील संशयीत आरोपीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने जळगाव पोलिस दलात खळबळ माजली आहे. अमळनेर पोलिस स्टेशनच्या लॉकअपमधील शौचालयात आज 9 मार्चच्या सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत.

घनशाम भाऊलाल कुमावत असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या संशयीत आरोपीचे नाव  आहे. चोरीच्या एका गुन्ह्यात त्याला संशयीत आरोपी म्हणून अटक करण्यात आली  होती. दरम्यान 9 मार्च 2024 रोजी सकाळीच त्याने शौचालयात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने खळबळ माजली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here