विस हजाराच्या लाचेत अडकले जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक

जळगाव : विस हजार रुपयांची लाच घेतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील दोघे लिपीक एसीबीच्या सापळ्यात अडकले असून दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश  रमेशराव वानखेडे (मुळ रा. नेर जिल्हा यवतमाळ) आणि समाधान लोटन पवार (रा. लालबाग कॉलनी पारोळा ता. पारोळा जि. जळगांव) अशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत विभागातील दोघा लाचखोर लिपिकांची नावे आहेत.

या घटनेतील तक्रारदार ग्रामपंचायत निवडणुक 2021 मध्ये निवडून आले होते. रायपूर गावातील गैरअर्जदाराने निवडून आलेल्या तक्रारदाराच्या तिन अपत्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाकडे गैरार्जदाराने तक्रार अर्ज दाखल केला होता. लोकसेवक महेश वानखेडे या लिपिकाकडे या अर्जाचे कामकाज पेंडींग होते. तक्रारदाराने लिपिक महेश वानखेडे यांची भेट घेतली होती. तुमच्या तिन अपत्यांबाबत सकारात्मक अहवाल तयार  करुन देतो, तुम्ही अपात्र होणार नाही. तुम्ही मला मदतीच्या बदल्यात तिस हजार रुपये द्या असे लिपीक महेश वानखेडे याने तक्रारदारास सांगितले होते.

तक्रारदारास लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी एसीबी कार्यालय गाठून आपली कैफीयत मांडली. त्यानुसार पुढील कारवाई सुरु करण्यात आली. पडताळणी अंती दोघे दोषी आढळून आले. वानखेडे यांच्या मागणीनुसार लिपीक समाधान पवार याने विस हजार रुपयांची लाच  घेतली. लाचेची रक्कम समाधान पवार याने स्विकारताच एसीबी पथकाने समाधान पवार यास ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या अधिपत्याखाली पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव यांच्यासह सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ अमोल सुर्यवंशी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या कारवाईत पोलिस निरीक्षक अमोल वालझडे, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ प्रदिप पोळ आदींनी सहकार्य केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here