चोरीच्या बारा मोटारसायकलींसह तिघांना अटक

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी मोटरसायकल चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या बारा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. भुसावळ शहरातून मोटर सायकल चोरी झालेल्या मोटरसायकलचा तपास हे. कॉ. विजय नेरकर करत होते.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे शेख बासीद शेख बाबू (रा. सुलतानपुरा, जि. जळगाव जामोद, ह. मु. मोहम्मदी नगर भुसावळ), मोहम्मद अयाज मोहम्मद एजाज (रा. सुलतानपुरा, जि. जळगाव जामोद) व रवींद्र अंबादास घोडसे (रा. परसोडा ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) या तिघा संशयितांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी भुसावळ, जळगाव, जळगाव जामोद, बुलढाणा व बुऱ्हानपूर आदी ठिकाणाहून मोटरसायकली चोरी केल्याचे कबुल केले.

4 लाख 65 हजार रुपये किमतीच्या बारा मोटरसायकली तिघांकडून जप्त करण्यात आल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडघम, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव व पो हे कॉ विजय नेरकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, समाधान पाटील, निलेश चौधरी, रमण सुरडकर, उमाकांत पाटील, दिनेश कापडणे, सचिन चौधरी, राहुल वानखेडे, भूषण चौधरी, जावेद शहा, प्रशांत सोनार, योगेश महाजन, प्रशांत परदेशी, योगेश माळी व अमर अडाळे आदिंनी या पथकात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here