पळून जाणा-या संशयीतास अटक

जळगाव : भल्या पहाटे पोलिसांना बघून पळून जाणा-या संशयीतास जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने एका  संशयीतास अटक केली असून त्याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत आनंदा सोनवणे (रा. मोहन नगर महाबळ जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

जळगाव शहर पोलिसांचे पथक 18 मार्चच्या पहाटे सव्वातिन वाजेच्या सुमारास हद्दपार आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान त्यांना हद्दीतील जुनी सरस्वती डेअरी परिसरातील गल्लीत एक संशयीत इसम लपून बसलेला दिसला. पोलिस पथकाला त्याचा संशय आला. पोलिस आपल्याकडे येत असल्याचे बघून तो पलायन करु लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकातील सफौ बशिर तडवी, पोहेकॉ भास्कर ठाकरे, पोना योगेश पाटील, रतन गिते, ज्ञानेश्र्वर उन्हाळे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. संशयीताविरुद्ध जळगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here