नाकाबंदी दरम्यान आढळले वीस लाखांचे दागिने

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने मुक्ताईनगर येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिस पथकास सुमारे वीस लाख रुपये किमतीचे 279.730 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले आहेत. पोलिसांनी मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावण्यात आली होती. 

नाकाबंदी दरम्यान नाकाबंदी पथकाचे सपोनि. संदीप दूनगहू, पो. हवा. छोटु वैद्य, पो.शि. प्रशांत चौधरी, पोशि.प्रविण जाधव, पोशि.अभिमण पाटील यांना एक संशयीत कार येताना दिसली. त्यांनी कार थांबवून कारची तपासणी केली असता त्यामध्ये भवरलाल जेठमल जैन (रा. जळगाव) यांच्या ताब्यातील बॅगमध्ये 279.730 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (अंदाजे किमत 20,00,000/- रुपये) कोणत्याही पावती विना/परवाना विना आढळून आले. 

यावेळी फिरते पथक प्रमुख असिस्टंट इंजीनीयर अनिल नेरपगार, पंचायत समीती बोदवड यांना बोलावुन त्याचेकडे पुढील कायदेशीर कारवाईस्तव हस्तांतरीत करण्यात आलेले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि नागेश मोहीते, सपोनि संदीप दूनगहू, पो. हवा. छोटु वैद्य, पो.शि. प्रशांत चौधरी, पोशि.प्रविण जाधव, पोशि. अभिमण पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here