चाकूच्या धाकावर जबरी चोरीचा प्रयत्न – तरुण कारागृहात 

जळगाव : ज्या दुकानदाराकडे पूर्वी कामाला होता त्यालाच रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत त्याच्या ताब्यातील पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणा-या तरुणाला एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. गौरव खुशाल जैस्वाल (रा. नाथवाडा – जळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

“किरण चहा” या दुकानात पूर्वी गौरव कामाला होता. दि.26/03/2024 रोजी रात्री 09 : 30 वाजता दुकानदार ओम गोपाल चुघरा हे स्कुटीने नेहरु नगर परिसरातून जात होते. त्यावेळी गौरवने दुकानदार ओम चुघरा यांना चाकूचा धाक दाखवत बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ.किरण पाटील, चंद्रकांत पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. ऑनलाईन शेअर मार्केट मध्ये पैसे गमावल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या गौरवच्या हातून नैराश्येतून हा गुन्हा घडला आणि त्याला न्यायालयीन कोठडीत जावे लागले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here