टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार – सहा महिन्यासाठी झाले हद्दपार 

जळगाव : चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील दोघा सराईत व टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. टोळी प्रमुख जगदीश जगन्नाथ महाजन आणि टोळी सदस्य दादु उर्फ विशाल जगदीश महाजन (दोघे रा. नेताजी पालकर चौक चाळीसगाव) अशी त्यांची नावे आहेत. 

या दोघांविरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, घातक हत्यार बाळगणे गुंगीकारक अंमली पदार्थ बाळगणे, दंगल करणे असे एकुण दहा गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे त्यांनी टोळीने केले आहेत. त्यांचा हद्दपार प्रस्ताव चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आपले सहकारी पोहेकॉ विनोद भोई, पोना तुकाराम चव्हाण, पोना महेद्र पाटील आदींच्या मदतीने तयार करुन पोलिस अधिक्षकांकडे सादर केला होता. हद्दपार प्रस्तावावरील कामकाजात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here