आगम वाचना शिबीराचा समारोप – सेवार्थी भवरलालजी आणि कांताई जैन परिवाराचा हृदय सत्कार

जळगाव, दि. ७ (प्रतिनिधी) – मनुष्य जीवनातील अंधार दूर करण्याची ताकद ही ज्ञानात आहे. हे ज्ञान म्हणजे दुसऱ्यांविषयी कल्याण भावना श्रेष्ठ असल्याची शिकवण देणारे हवे.  मानवी जीवनाला प्रकाशमान करणारे ठाणांग सूत्र आगम वाचना हे पाप प्रवृत्तीपेक्षा धर्मवृत्ती ही श्रेष्ठ असल्याची शिकवण देते आणि धर्माची ताकद वाढविते, असे आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी सांगितले. जैन हिल्स स्थित आकाश प्रांगण येथील ‘हिरा संस्कार छत्र’ येथे तिन दिवसीय जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ शिबीराचा आज समारोप झाला. यावेळी विजय रत्नसुंदरसुरीश्वरीजी महाराज साहेब श्रावक-श्राविकांना मार्गदर्शन करत होते. 

या कार्यक्रमाचे सेवार्थी भवरलाल आणि कांताबाई जैन परिवार यांचा हृदय सत्कार गुरूदेवांच्या सान्निध्यात यावेळी करण्यात आला. हा सत्कार जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, विपणन प्रमुख अभय जैन, अभेद्य जैन, अभंग जैन, अन्मय जैन यांनी स्वीकारला. शाल, मोत्याचा हार असे पुरस्काराचे स्वरूप होते. श्री जैन श्वेतांबर मूर्तीपुजक संघाचे अध्यक्ष ललित लोडाया, प्रविण सिसोदिया, स्वरूप लुंकड, दिलीप गांधी, संजय गांधी यांच्यासह कौशीक संघवी, निखील कुसमगंज, प्रमोद भाई, कानजीभाई यांनी हा सत्कार केला. यावेळी सूत्रसंचालन नितीन चोपडा, संजय गांधी यांनी केले.

 ठाणांग सूत्रांचा उपयोग कसा करावा, बुद्धीगत की हृदयगत यावर विवेचन करताना आगम वाचना मधील सर्वात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे कर्मसिद्धात होय. श्रेष्ठ भावना ही मैत्र भावना ठेवावी, श्रेष्ठ व्रत अहिंसा, श्रेष्ठ दृष्टी अनेकांत दृष्टी, श्रेष्ठ भाव उपशम भाव, श्रेष्ठ रस शांत रस याचे हृदयगत आचरण करावे बुद्धीगत नाही. कुठलीही व्यक्ती, वस्तू, परिस्थिती हे आपल्याला दु:खी करत असेल, अपमानित करित असेल तर ती माझी स्वत:ची चुक आहे पुर्वभवामधील पुण्याचा प्रभाव आहे, असेच समजावे. यासाठी धर्मबिंदू आणि धर्मरत्न हे प्रकरण वाचावे असेही महाराज साहेब सांगतात. गुरू शिष्याच्या नात्यांवर भाष्य करताना प्रभू श्रीरामासारखे गुरू शिष्याचे नाते असावे. आपल्या दृष्टीला चांगली वाटणारी गोष्ट आपल्या गुरूंना चांगली वाटेल असे नाही. आगम वाचन हे जीवनातील कोच, गाईड, कॅप्टन प्रमाणे काम करतात. सत्याचा आधार धरून जीवनात परिवर्तन करण्याचे काम हे विचार करतात. यासाठी संपूर्ण वातानुकुलित असलेल्या बसच्या ड्रायव्हरला उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतात, त्याच प्रमाणे गुरूंचे कार्यही असते. दिवसभरात सहा वेळा नवकार बोलण्याने सदगती प्राप्त होईल याची गॅरंटी नाही, मात्र नवकार प्रत्यक्ष आचरणात आणल्याने सदगती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असे विचार परमपूज्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रेयस कुमट, नरेंद्र सांडेचा, दीपक राखेचा, कमलेश बोरा, राजू कावड, सागर पाटील, अमित कोठारी, किरण जैन निबजिया, निखिल शाह, सुनील शेठ, राहुल कोठारी, महिपाल निबजिया, जीतू गांधी, कुणाल निबजिया, गौरव गांधी, नरेंद्र नानेशा,  संजय कासवा, अजय मुणोत, दीपक निबजिया आदिंनी परिश्रम घेतलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here