जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

जळगाव दि. १४ प्रतिनिधी –  जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा दिनानिमित्त  १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. ‘आगीपासून सुरक्षितता सुनिश्चत करा, राष्ट्र उभारणीत योगदान द्या’ या संदेशासह वेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. आज आग विझविण्यासाठी धारातीर्थी शहीद अग्रीशमन जवानांना जैन इरिगेशनच्या अग्रीशमन विभागाच्या सहकाऱ्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जैन व्हॅली मध्ये झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अग्नीशमन दलाचे सहकारी, वरिष्ट सहकारांसह सुनील गुप्ता, जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, वाय. जे. पाटील यांच्यासह फायर सेफ्टी विभागाचे अधिकारी कैलास सैदांणे, निखिल भोळे, हेमकांत पाटील, जे. जे. पाटील, देवेंद्र पाटील, मनोज पाटील, प्रविण पाटील, महेंद्रसिंग पाटील, जितेंद्र पाटील यांच्यासह सहकारी उपस्थित होते. या सप्ताहाअंतर्गत कंपनीच्या आस्थापनांमधील प्रत्येक विभागात आग विझविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याबाबतच्या वापराबाबत प्रात्यक्षिकांसहीत माहिती सादर करण्यात येत आहे. या प्रशिक्षण उपक्रमाचा सहकाऱ्यांकडून लाभ घेतला जात आहे. ज्वलनशील पदार्थ सुव्यवस्थीत ठिकाणी ठेऊन अपघात होवू नये हिच खरी आपल्यातर्फे शहीदांना श्रद्धांजली ठरू शकते असे मार्गदर्शन करण्यात आले.

अग्रीशमन दिनानिमित्त शहीदांना श्रद्धांजली..

जैन फूडपार्कच्या जैन व्हॅली येथे अग्नीशमन दिवस साजरा झाला. १४ एप्रिल १९४४ रोजी फोर्टस्टीकेन मालवाहतूक जहाज, व्हिक्टोरिया डॉक, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे स्फोटक पदार्थ वाहून आणणारे जाहजास अचानक आग लागली होती, या जहाजात युद्ध सामुग्री स्फोटक पदार्थ, कापसाच्या गाठी आदी साहित्यमध्ये आग लागली होती. ही आग विझवीताना मुंबई अग्नीशमन दलाचे ६६ जवान शहीद झाले होते, त्यांचा स्मरणार्थ संपूर्ण देशात भारत सरकारच्या आदेशानुसार अग्नीशमन सेवा दिवस व सप्ताह साजरा राबविण्यात येतो. त्यानिमित्त जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये अग्नीशमन दिवस व सप्ताह निमित्ताने आग विझवण्यासाठी वापरात येणाऱ्या साहित्याचे प्रात्यक्षिक माहिती सादर करुन, त्यावेळी आग विझवण्यासाठी धारातीर्थी शहीद अग्नीशमन जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here