अनाधिकारे एसीचा वापर – कार्यवाहीबाबत उपायुक्तांचे जिल्हाधिका-यांना पत्र 

जळगाव : अधिकार नसतांना अनेक शासकीय अधिकारी आपल्या दालनात एसीचा वापर करत आहेत. याबाबत जळगावचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचा वरीष्ठ शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरुच आहे. या पाठपुराव्याचा भाग म्हणून रमेश काळे (उपआयुक्त सामान्य प्रशासन नाशिक विभाग नाशिक) यांच्या सहीचे एक पत्र जळगाव जिल्हाधिकारी यांना आले आहे. 

अनेक शासकीय अधिकारी नियमात बसत नसतांना आपल्या दालनात वातानुकूलित यंत्राचा वापर करत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी जळगांव व त्यांचे अधिनस्त कार्यरत अधिकारी यांनी या नियमांचे तंतोतंत पालन करावे. तसेच करण्यात आलेल्या कारवाईबाबत तक्रारदार गुप्ता यांना कळवण्यात यावे असे जिल्हाधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे. एक उन्हाळा जावून दुसरा उन्हाळा आला तरी याबाबत केवळ कागदोपत्री कामकाज सुरु असल्याचे या पत्राच्या निमित्ताने समोर आले आहे. प्रत्यक्ष ठोस कारवाई कधी होणार याबाबत जनतेला उत्सुकता लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here