नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती तथा काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे आज दुख:द निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मेंदूवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना कोरोनाची देखील लागण झाली होती. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचा मृत्यूसोबतची झुंज आज संपुष्टात आली.प्रणव मुखर्जी सन २०१२ ते २०१७ या कालावधीत देशाचे राष्ट्रपती होते. त्यापुर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये वित्त, संरक्षण, परराष्ट्र अशा विविध पदांवर काम केले.