दोघे सोनसाखळी चोर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : मोटर सायकलने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुसऱ्या मोटरसायकल वर डबल सीट बसलेल्या इसमाने ओरबाडून पलायन केल्याची घटना 13 मे रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. या घटनेतील दोघा मोटरसायकलस्वारांना अटक करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिनांक 13 मे 2024 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास खुशी प्रवीण महाजन ही महिला तिच्या आईसोबत सुप्रीम कॉलनीच्या दिशेने ज्युपिटर मोटरसायकलने जात होती. वाटेत काशिनाथ चौफुली परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ मोटरसायकलवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या इसमाने धावत्या मोटरसायकलवरुन खुशी महाजन यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची पोत जबरीने हिसकावून पलायन केले होते.  हा गुन्हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केला असून ते तांबापुरा परिसराच्या दिशेने पळून गेले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना समजली. 

त्या माहितीच्या आधारे दोघांना क्रमाक्रमाने ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. सखोल चौकशीअंती दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. अटके नंतर दोघांना न्या. जी. आर. कोलते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने अँड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. गुन्हा घडल्यानंतर व दाखल झाल्यानंतर तातडीने सहा तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आला आहे. अटकेतील आरोपींपैकी एकाविरुद्ध खून, जबरी चोरी, हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउपनि दत्तात्रय पोटे, पोउपनि निलेश गोसावी, सहायक फौजदार अतुल वंजारी, किरण पाटील, किशोर पाटील, राजेंद्र कांडेलकर, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, सतिष गर्जे, राहुल रगडे, छगन तायडे, योगेश बारी, राहुल पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here