पुणे-डोंबिवली प्रकरणाने राजकारण तापले, फडणवीस बॅकफूटवर – राजीनाम्याची मागणी

पुणे : पुण्याचा श्रीमंत बिल्डर विशाल अग्रवाल यास मुलाच्या हिट अ‍ॅंड रन प्रकरणात पोलिसांनी संभाजीनगरातून अटक केल्यानंतर तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या अपघातात दोघे ठार झाल्याने आणि पोलिस अधिकारी आरोपीला वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याच्या वृत्ताने पुण्यात पोलिस यंत्रणेबद्दल प्रचंड राग व्यक्त झाला. हा राग व्यक्त होत असतांना असाच प्रयत्न भाजप नेते मंडळी करत असल्याचा दुसरा आरोप कॉंग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला. पोलिस यंत्रणेने करोडो रुपये घेतल्याचा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला.

दरम्यान अपघातास कारणीभूत बिल्डर पुत्र अल्पवयीन असल्याने त्याच्याबाबत बाल हक्क न्यायालयाने दिलेल्या जामीनाबाबतही रोष व्यक्त करण्यात आला. या बाल हक्क न्यायालयास कथित जामीनाचा फेर विचार करावा अशी मागणी करण्यात आल्याचे म्हटले गेले. याच प्रकरणात प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्याचे देखील म्हटले गेले.

पुण्याचे हे हिट अ‍ॅंड रन अपघात प्रकरण दोन जणांचा बळी घेणारे म्हणूनच नव्हे तर अल्पवयीन मुलाने दारु पिणे, पब मधे जाणे, कोणत्याच परवान्याशिवाय बेदरकार कार चालवणे, पिता विशाल अग्रवालचे फरार होणे, पोलिसांना चकमा देत कोल्हापूर मार्गे संभाजीनगर गाठणे अशा फिल्मी स्टाईलने गेले. राहुल गांधी यांच्यासह रविंद्र धंगेकर, खा. संजय राऊत, शिवसेनेच्या माजी आमदारांनी एंट्री नोंदवत या बिल्डरची कथित गुन्हेगारी पार्श्वभुमी उघड करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न चालवला.

सन 2009 मधे विधानसभा निवडणूका लढवणारे अजय भोसले यांच्यावर गोळीबार झाला होता. या भोसलेंच्या म्हणण्यानुसार राम, सुरेंद्र आणि विशाल या भावांची गुन्हेगारी पार्श्वभुमी, पोलिस स्टेशनमधे रिपोर्ट तपासावे. आ. धंगेकर आणि खा. संजय राऊत या दोघांनी पुणे पोलिस आयुक्तांना तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी केली. धंगेकरांच्या आरोपानुसार तपास अधिका-यांमार्फत करोडोंची धनराशी वरिष्ठ पातळीपर्यंत गेली. पुण्यातल्या बेकायदा पब्ज, बियर बार, मद्य व्यवसाय, बिल्डर्स यात भाजपवाल्या राजकारण्यांच्या सहभाग असल्याचा आरोप आहे. पोलिस आयुक्तांना तात्काळ निलंबीत करुन चौकशी करावी अशीही मागणी होत आहे.

ही अपघात घडवणारी पोर्शे कार बंगलोरच्या डीलरने दिली. तिची 18 एप्रिलला तात्पुरती नोंदणी झाली. 17 सप्टेबरपर्यंत तात्पुरता परवाना. त्यानंतर रजिस्ट्रेशन मात्र 1758 रुपयांचे पेमेंट केले नाही म्हणून प्रलंबित. गुन्हा केल्यास वयाच्या 25 वर्षापर्यंत वाहन चालवण्याचा परवाना नाही असे आरटीओ अधिकारी भोर यांनी सांगितले आहे. दरम्यान असिम सरोदे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली. आरोपीस जामीन दिल्याबद्दल जनतेत संताप दिसत असला तरी भावनाशिल होऊ नये असे अ‍ॅड. असिम सरोदे म्हणाले. काही अटींवर जामीन आहे.

कथित श्रीमंत अपराध्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पुण्यासह राज्यभरातून प्रचंड संताप व्यक्त झाला. त्यानंतर उप मुख्यमंत्री फडणविसांनी पुण्यात धाव घेत बाल हक्क न्यायालयात फेर अपील दाखल करता येईल अशी सुचना केली. त्यानंतर त्याचा जामीन रद्द करुन बाल सुधारगृहात रवानगी करण्याचा कोर्टाचा निर्णय आला. परंतु यामुळे केवळ पोलिसच नव्हे तर गृहमंत्री देखील बॅक फुटवर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणीही रेटण्यात आली. तिकडे डोंबिवलीत केमिकल कंपनी स्फोटात सात लोक ठार झाले. तरी सध्याचे राजकारण पाहता फडणविसांचा राजीनामा होणे नाही. नैतिकतेच्या भुमिकेवर राजिनामे देण्याचे दिवस कधीच संपले आहेत. राजकारण्यांनी नैतिकता कोळून प्यायल्याचे लोकात बोलले जाते. दरम्यान वेदांतचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना चौकशीकामी पोलिसांनी पाचारण केल्याचे वृत्त आहे. शिवाय दोन जणांना चिरडून मारणारी ती कार बिघडलेली होती, नादुरुस्त होती असे नवे कारण पुढे करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

तसेच या प्रकरणात गृह, विधी – न्याय खातेही फडणविसांकडे आहे. मुख्यमंत्र्यांकडे परिवहन तर शंभुराज देसाईंकडे राज्य उत्पादन शुल्क खाते आहे. त्यामुळे हे तिन नेते आरोपांच्या टप्प्यात आले आहेत. पुणे मनपा हद्दीतील दारु परवाने, बेकायदा पब, पोलिस विभाग या सर्वांचा भ्रष्टाचार गाजतोय. पुणेकरांनी जोरदार आवाज उठवल्याने श्रीमंत आरोपीच्या मुलाचा जामीन रद्द होऊन बालसुधार कोठडी मिळाली.

पुण्यातील वृत्त विश्लेषकांच्या वृत्तानुसार अपघातानंतर रात्री पोलिस स्टेशनमधे धावलेला आमदार हा इंजीनिअर असून आमदारकीपुर्वी या अग्रवालांच्या कंपनीत कार्यरत होता म्हणजे नोकरीत होता असे समजते. केवळ कल्याणीनगर नव्हे तर संपुर्ण पुण्याच्या उप नगरातील दारु बियर, आरटीओ परवाने, दारुबंदी धोरण, अवैध धंद्यासह जमीन प्रकरणातील खाबुगिरी बंद करा अशी मागणी वसंत मोरे आणि धंगेकरांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here