ना‍शिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 आचारसंहिता लागू

जळगाव : मुख्य निवडणूक अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र बीआयई  २०२४/प्र.क्र.६७९/२४/३३ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुक  २०२४ ची घोषणा केलेली असून जळगाव जिल्हयात यापुर्वी दिनांक ६ जून, २०२४ पर्यंत लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आचार संहिता लागु होती सदर आचार संहिता पुर्वी लक्षी प्रभावाने नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यत दिनांक ७ जुलै , २०२४ पर्यंत लागू राहील.

दि. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अफक्ट १९९५ व भारत निवडणूक आयोग दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करणेवर बंदी घातलेली आहे.    

दि. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट १९९५ व भारत निवडणुक आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करणे यावर बंदी घातलेली आहे.

अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष, उमेदवाराने खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भित्ती पत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक व चिन्ह इत्यादी त्वरीत काढुन घ्यावे. दि. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट १९९५ अन्वये अशा प्रकारे मालमता विद्रुपित केल्यास ३ महिन्यापर्यत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी  कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here