गायिका अलका याज्ञिक यांनी गमावली श्रवणशक्ती

मुंबई : आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांनी आपली श्रवणशक्ती गमावल्याची माहिती पुढे आली आहे. मोठ्या आवाजातील संगीत श्रवण करण्यासह हेडफोन्सचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर टाळण्याचा सल्ला यानिमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातून दिला जात आहे. 

पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना एका दुर्मीळ आजाराने ग्रासल्याचे निदान वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. व्हायरल अटॅकचा हा अचानकपणे झालेला परिणाम आपल्या श्रवणशक्तीवर झाल्याची माहिती अलका यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून दिली आहे. अलका यांनी स्वतःच पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली आहे. मोठ्या आवाजातील संगीतापासून दूर राहण्याचा सल्ला अलका याज्ञिक यांनी आपल्या चाहत्यांसह सहकलाकारांना दिला आहे. 

काही दिवसांपूर्वी अलका याज्ञीक विमानातून बाहेर पडल्यावर त्यांना अचानक काहीही ऐकू येत नसल्याचे जाणवले. व्हायरल अटॅकमुळे ‘दुर्मीळ सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस’ म्हणजेच संवेदी मज्जातंतूंमुळे श्रवणशक्ती गमावल्याचे निदान डॉक्टरांनी जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here