सौ. चित्राताई वाघ यांना विधान परिषदेत स्थान मिळावे – सुवर्णकार समाजाची मागणी

नाशिक (प्रतिनिधी) – अंगी समाजसेवी वृत्ती बाळगत जनहितासाठी लढत पुढे आलेल्या सौ. चित्राताई वाघ यांनी आपले समाजसेविकेचे एक आगळेवेगळे वलय निर्माण केले आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आपली कारकीर्द सुरु करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी, पुढे समाजसेविका म्हणून नावारुपास आलेल्या आणि नंतर समन्वयक, सामंजस्य, एकोपा, सलोखा आणि सौहार्द ही पंचसूत्री अंगिकरलेल्या सौ. चित्राताई वाघ यांनी राजकीय क्षेत्रातदेखील आपल्या कार्याचा सामाजिक व राजकिय ठसा उमटवला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या सध्या आपली भूमिका कर्तव्यदक्षतेने निभावत आहेत. कलम ४११ चा फटका बसलेल्या सोनार सराफ व्यावसायिकांना त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन महाराष्ट्रातील सराफ यांना कायद्याने दिलासा मिळवून दिला आहे. जिल्हास्तरावर सोनार सराफ व्यावसायिकांसाठी दक्षता समिती नेमण्याच्या सूचना सुधारित अध्यादेश द्वारे देण्यात आल्या आहेत. या कार्याची व इतर सामाजिक राजकिय कार्याची दखल घेऊन सौ. चित्राताई वाघ यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषद उमेदवारी देण्याचा विचार करावा, अशी आग्रही मागणी सकल भारतीय सोनार समाज संघटन, ऑल इंडिया सोनार फेडरेशन तसेच सेतुबंधन मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्यासह सर्व शाखीय सोनार समाज बंधु भगिणींनी केली आहे.

सौ. चित्राताई वाघ यांची कर्तव्यदक्ष व आक्रमक महिला प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे जाणते व माहितीगार राजकिय तज्ञान कडून संकेत प्राप्त झाले आहेत. तसेच सौ. वाघ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here