देशभरात सोमवारपासून लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेत (बीएनएस) यापूर्वीच्या भारतीय दंड संहिता (आयपीसी) कायद्याप्रमाणेच कमाल 15 दिवसांच्या पोलिस कोठडीची तरतूद असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. एकप्रकारे नव्या कायद्यातील पोलिस कोठडीचा अवधी वाढवण्यात आल्याबाबतचा संभ्रम त्यांनी दूर केला आहे.
यापूर्वी कोणत्याही संशयित आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी केल्यानंतर तो वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली 15 दिवस रुग्णालयात दाखल झाल्यास त्याची चौकशी करता येत नव्हती. कारण वैद्यकीय उपचारा दरम्यान त्याच्या पोलिस कोठडीचा कालावधी संपत असे. ‘बीएनएस’ मध्ये कमाल 15 दिवसांची कोठडी असेल, परंतु साठ दिवसांच्या मर्यादेत हा कालावधी तुकड्या-तुकड्यांत घेता येऊ शकतो’, असे शहा यांनी स्पष्ट केले आहे.