तापी महामंडळातील हजारो कोटींच्या बनवाबनवीवर शिंदे, फडणवीस गप्प का ?

महाराष्ट्रात सध्या देणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची राज्याच्या राजकारणातील प्रतिमा उंचावल्याचे वृत्त असून त्यांच्या समक्ष किंवा काकणभर सरस असे एका गटाला वाटणारे देवेन्द्र फडणवीस यांची भाजपा भ्रष्टाचार समर्थक? अशी नवी प्रतिमा निर्माण झाल्याचे बोलले जाते. 

भाजपाने दिलेले “स्क्रिप्ट”(भाषण) वाचून दाखवणारे असे कधी काळी म्हटले गेलेले शिंदे दणकेबाज भाषणबाजी करून ‘लाडकी बहिण-भाऊ’ योजनामुळे जोमात आघाडीवर आले आहेत. तर फडणवीस तूर्तास भाजपाचे संकटमोचक भ्रष्टाचार समर्थक अशा स्वरूपात वावरतात की काय? असे जळगाव जिल्हयातील तापी पाटबंधारे विकास महामंडळात सध्या गाजत असलेल्या शेकड़ो हजारो कोटींच्या योजनांची कंत्राटे पळवापळवी, भ्रष्टाचार मॅनेजमेंट, शेकडो कोटींचा काळा पैसा याच्या उघड चर्चेने बोलले जाते. 

उध्दव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद द्यावे त्यांचा विश्वासघात झाला असे म्हणत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद व्याकूळ झाले. दादागटाला सत्तेतून काढण्यासाठी भाजपाची मुखपत्रे (ऑर्गनायजर विवेक) नगारा बडवताहेत.

पण देवेन्द्रजी काय करताहेत? विधान परिषद निवडणूक मॅनेजमेंट? खान्देशात तापी महामंडळाच्या शेततळ्याच्या टेंडरसाठी सामाजिक दायित्व (एस. आर. एस. फंडा) साठी माजी सेवानिवृत्त अभियंत्याला ४५ लाखाची रकम दिसल्याचे आ. एकनाथ खडसेंचे नातेवाईक असलेल्या अजय बढे नामक ठेकेदाराने पत्रकार परिषदेत सांगितले. एवढेच नव्हे तर चार हजार शेततळ्यांच्या माध्यमातून जामनेर तालुक्यात शेती समृध्दी योजना जाहीर करण्यात आली. त्यातून ५० कोटींची कामे देण्यासाठी ४५ लाख उकळले असा आरोप आहे. 

मात्र वरील फंडाची रकम मिळवण्यासाठी १०० कोटीची लाच द्यावी लागणे, ठाण्यात कुणा सोम्मय्यांचे ४०० कोटी, चंदीगडला हजारो कोटी लक्ष्मीदर्शन आणि प्रकरण मिटवण्यासाठी फडणवीस समर्थक मंत्री गिरीश महाजनांचा झालेला उल्लेख ही बाजू काय दर्शवते? असे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, संभाजीनगर, मुंबई, विदर्भ-मराठवाड्यात प्रश्न विचारले जात असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here