नवी दिल्ली : पुरुष आणि महिला दोघेही लैंगिक छळ करु शकतात असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान नोंदवले आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात महिला आरोपीचा ढाल म्हणून वापर करता येऊ शकत नाही. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे पीडित पुरुष वर्गाला एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. जयराम भंभानी यांची टिप्पणी आली.
पोक्सो कायद्याच्या कलम 3 अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आणि कलम 5 अंतर्गत गंभीर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा एखाद्या महिलेविरुद्ध नोंदवला जाऊ शकत नाही असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला होता. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी पोक्सो कायदा तयार करण्यात आला आहे. बालकाविरुद्ध गुन्हा एखादा पुरुष किवा स्त्री देखील करु शकते, असे न्यायमूर्तीनी आपल्या 15 पानी आदेशात म्हटले आहे.
गुन्हेगाराचा (स्त्री आणि पुरुष दोन्ही) समावेश आहे. या तरतुदींमध्ये लैंगिक अत्याचाराच्या कक्षेत कोणतीही वस्तू किंवा शरीराच्या भागाचा प्रवेश किंवा पेनेट्रेशनसाठी मुलाच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी छेडछाड करणे किंवा तोंडाचा वापर करणेदेखील समाविष्ट आहे, असेही खंडपीठाने नमूद केले आहे.