शस्त्राच्या धाकावर बकऱ्या चोरी करणारी टोळी जेरबंद

On: October 4, 2024 7:39 PM

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात शस्त्राच्या धाकावर बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. चेतन गायकवाड, गोरख फकीरा गायकवाड, बबलु आबा जाधव, गोरख सुरेश गोकुळ, सोमनाथ भिकन गायकवाड, गोकुळ गायकवाड व शंकर मोरे (सर्व रा.भवाळी तालुका चाळीसगाव) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. गोकुळ गायकवाड व शंकर मोरे अशी पोलिस मागावर असल्याची चाहूल लागल्याने फरार झालेल्या दोघांची नावे आहेत. 

हिंगणे तालुका चाळीसगाव येथील एका शेतात खाटीवर झोपलेल्या इसमास शस्त्राचा भाग दाखवून या सर्वांनी 19 बोकड व सात बकऱ्या चोरुन नेल्या होत्या. अटकेतील पाच चोरट्यांनी बोकड व बकऱ्या चोरुन विक्री केल्यानंतर आलेली रोख रक्कम आपसात वाटून घेतली होती. त्यांच्याकडून 1 लाख 9 हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली 26 हजार रुपये किमतीची मोटार सायकल असा एकुण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इतर फरार दोघा चोरट्यांच्या मागावर पोलिस पथक आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, हे कॉ संदिप पाटील, हरीलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दिपक चौधरी आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment