नोकरीच्या आमिषासह बनावट ऑर्डर देणाऱ्यास तीन वर्ष कारावास

 जळगाव : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे संगनमताने आमिष दाखवत बनावट ऑर्डर देणाऱ्यास तीन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपये शिक्षा तसेच तक्रारदार फिर्यादीस पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश चोपडा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. व्ही. राठोड (पाटील) यांच्या न्यायालयाने दिले आहे. प्रकाश हरीचंद सोनवणे (रा. भुसावळ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कमल बन्सी मोहिते यास सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. 

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील रहिवासी रवींद्र गंभीर पाटील यांचा मुलगा राहुल रविद्र पाटील यास रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवण्याचे काम ऑक्टोबर 2020 या कालावधीत भुसावळ येथील प्रकाश हरिचंद सोनवणे याने इतरांच्या मदतीने संगनमताने केले होते. या आमिषाला रविंद्र पाटील व इतर लोक बळी पडले होते. प्रकाश हरीचंद सोनवणे याने इतरांच्या मदतीने रवींद्र पाटील यांना त्यांचा मुलगा राहुल यास रेल्वेत नोकरी लावून देण्यासाठी चार लाख रुपयांची मागणी केली होती. रवींद्र पाटील यांनी चार लाख रुपयांपैकी रोख साठ हजार रुपये दिले होते. याशिवाय 2 लाख 10 हजार रुपये आरोपी प्रकाश सोनवणे याच्या बँक खात्यावर जमा केले. त्यानंतर रेल्वेतील नोकरीच्या बनावट ऑर्डर देऊन पुन्हा 1 लाख 30 हजार रुपयांची मागणी केली. पडताळणीअंती नोकरीच्या ऑर्डर बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रवींद्र गंभीर पाटील यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला गु. र. नं. 154/2023 भा.द.वि. वीभा.द.वि.420, 465, 467, 471, 34 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत यांनी सुरु केला. चोपडा न्यायालयात याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

चोपडा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम व्ही राठोड (पाटील) यांच्या न्यायालयाने आरोपी प्रकाश हरीचंद सोनवने यास तीन वर्ष करावास व 50 हजार रुपये दंड व फिर्यादीस 50 हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यातील संशयित आरोपी कमल बन्सी मोहिते याला सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. तपासणी अधिकारी म्हणून पो.हे. कॉ प्रदीप हिम्मत राजपूत यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील म्हणून अँड. व्ही. व्ही. घोडेस्वार व केसवॉच व पैरवी अधिकारी म्हणून पो.कॉ. प्रकाश मधुकर ठाकरे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here