आ. चित्राताई वाघ, आ. माधुरीताई मिसाळ यांना मंत्रिपद मिळावे – सर्व शाखीय सोनार समाजाची मागणी

नाशिकरोड (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात पंधराव्या विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या चुरशीच्या निवडणुकांमध्ये महायुतीने घवघवीत यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पक्षासह महायुतीतील घटक पक्ष आणि सर्व विजयी उमेदवारांचे सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतु बंधन मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे मनस्वी नि हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी मंत्रिमंडळात आ. चित्राताई वाघ आणि आ. माधुरीताई मिसाळ यांची मंत्रीपदी वर्णी लावावी, अशी मागणी सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक मिलिंद कुमार सोनार, अन्य सहसंस्थापक सर्वश्री राजाभाऊ सोनार, शांतारामशेट दुसाने, विकास शांताराम विसपुते, आत्माराम ढेकळे, दिनेश येवले  अर्चनाताई सोनार, विलासराव अनासाने,  अशोकराव हिरुळकर, दिलीपराव महतकर, बालाजी सुवर्णकार, सुधाकरशेट भामरे, विवेक विभांडीक,  संजय नारायण तळेकर, ॲड अरुणराव सागळे, पुष्पाताई भामरे आदींनी केली आहे. पुणे येथील स्त्री शक्ती फाऊंडेशन ने देखील या मागणीचे समर्थन केले आहे. सर्व शाखीय सोनार समाजातर्फे या मागणीचे समर्थन होत आहे.

या महिन्यात महाराष्ट्रात नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक ही मावळत्या (अर्थात भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि अन्य घटक पक्षांच्या) महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे विशेष गाजली. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी या महायुतीच्या विजयाच्या तारणहार ठरल्या. या निवडणुकीत भाजप १३२ जागांवर विजय मिळवून मोठा भाऊ ठरला, शिवसेना (शिंदे गट) ५७ जागांवर विजय मिळवून मधला भाऊ ठरला, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) लहान भाऊ ठरला. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाराष्ट्रातील महिला मतदारांनी (लाडक्या बहिणींनी) अभूतपूर्व सहभाग घेऊन मतदानाधिकार बजावला. 

महाराष्ट्रात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कर्तव्यदक्षतेने भूमिका बजावणाऱ्या, विधान परिषद (राज्यपाल नियुक्त) सदस्य आ. चित्राताई वाघ आणि पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघातून चौथ्यांदा निवडून आलेल्या आ. माधुरीताई मिसाळ यांनी यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडल्यास राज्यातील  सोनार समाजात आनंदाची लहर निर्माण होईल, असा सूर उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here