भ्रष्टाचार समर्थक की विरोधक ? – भाजपाची प्रतिमा बदलाचे आव्हान!

On: December 6, 2024 11:56 AM

श्रीमान देवेन्द्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली आहे. यापूर्वी ते सि.एम. असतांना एक मंत्री “संकटमोचक म्हणून गाजला. पण तो “संकटमोचक” कुणाचा? फडणवीसांचा की भाजपाचा? असा प्रश्न समोर येवू पहात आहे. नुकतीच युती सरकारात लाडकी बहीण योजना गाजली? हा लाडका मंत्री आपल्या महाराष्ट्रातील साहेबांवर संकट आले असता धावून जातो. सी.एम. फडणवीस हे तसे स्वच्छ प्रतिमेचे समजले जातात. परंतु त्यांचा मंत्री भ्रष्टाचारी किंवा भ्रष्टाचार समर्थक चालवून घेणार कां? भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचार समर्थक की विरोधक? असा प्रश्न कधीपासून विचारला जात आहे.

ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असे भाजपाचे केंद्रीय नेते मोदीजी म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील खान्देशच्या तापी पाटबंधारे महामंडळातील भ्रष्टाचारी अभियंते आणि ठेकेदारांना पाठीशी घालणारा एक मंत्री शपथ घेतांना दिसेल. हे महोदय फडणवीसांचे लाडके म्हटले जातात. तापी महामंडळात जाती बांधव असलेल्यांनी भ्रष्टाचार केल्यास त्यांना पाठीशी घातले जाते असे बोलले जाते. जळगावात राहून उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता, मुख्य अभियंता, कार्यकारी संचालक अशा कोणत्याही पदावर राहून वारेमाप भ्रष्टाचार करणारांना कोण कोण मदत करतो? हा मुख्यमंत्र्यांशी निगडीत प्रश्न असल्याचे समजते. हेच महोदय सी.एम. असतांना तापी महामंडळात कामे सुरू नसतांना २०० कोटीची खोटी बिले नोंदवल्याचे प्रकरण विधानसभेत गाजले. खान्देशसह काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने हा प्रश्न विचारला होता. पैकी काँग्रेसचा माजी सी.एम. आता भाजपात खासदार आणि प्रश्नकर्ता काँग्रेसी आमदार त्याच्या पुत्राला तिकीट मिळवून पराभूत झाल्याने घरी बसून आहे.

तापी महामंडळात विदर्भ पाटबंधारे मंडळात २६ हजार कोटींच्या किंमत वाढीचे प्रकरण सिंचन घोटाळा म्हणून गाजवून भाजपा आज सत्तेत आहे. हे प्रकरण घडले तेव्हा एस. ई. असलेल्या अभियंत्यास खान्देशच्या दोन मंत्र्यांचे प्रोटेक्शन असल्याचे म्हटले जाते. त्या तत्कालीन अभिनंत्याविरुध्द एफआयआर नोंद आहे.

जेव्हा कोणी सत्तेवर नव्हते तेव्हा ६ महिने दाबून धरल्यावर पोलीस खात्याने हे प्रकरण बाहेर काढले आहे. ‘तो’ पुन्हा मंत्री झाल्यास पुन्हा दडपशाही होईल असे बोलले जाते. या प्रकरणामुळे भाजपाची आणि मंत्र्यासह सी.एम. ची प्रतिमा भ्रष्टाचार समर्थक म्हटली जात आहे. भाजपसह आपली प्रतिमा नवे सी.एम. किंवा भाजपाई करतील का ? असा प्रश्न उत्तर महाराष्ट्रात विचारला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment