माझी ताकद विरोधी पक्षातील 105 आमदारांना विचारा

On: September 6, 2020 8:56 PM

मुंबई : माझी काय ताकद आहे ते विरोधी पक्षातील 105 आमदारांना विचारा असे खा. संजय राऊत यांनी कंगना राणौत प्रकरणी सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे अजून दिसत नाही. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणाऱ्या कंगनाला संजय राऊत यांनी सुनावले आहे. त्यामुळे प्रतिउतर म्हणून कंगनानेदेखील वाद वाढवला आहे.

खा. संजय राऊत यांनी एका चॅनेलवर बोलताना कंगनाबद्दल काही शब्द उच्चारल्यामुळे कंगनाने एका व्हिडीओच्या माध्यमातून राऊत यांच्यावर टीका केली आहे. आज सोशल मीडियावर सेलिब्रिटींसह विरोधी पक्षांनी संजय राऊत यांना धारेवर धरत कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली. विरोधी पक्षातील भाजपाने सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी माफीची मागणी करणा-यांना चांगलेच सुनावले.

“माझी ताकद काय आहे, हे त्यांना जावून विचारा, ज्यांच्याजवळ १०५ आमदार असूनही ते विरोधी पक्षात बसले आहेत….जय महाराष्ट्र!” असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधी पक्षातील टीका करणा-यांना सुनावले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment