घाटंजी, यवतमाळ, (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांनी समाज कल्याण अधिकारी (यवतमाळ) माधव वैद्य व इतरांविरुद्ध घाटंजी न्यायालयात दाखल केलेली RCC/92/2005 केस बंद करण्यात आली आहे. तसेच घाटंजी पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी यांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रानुसार भादंवि कलम 418, 420, 468 सह कलम 34 हि केस RCC/223/2019 घाटंजी येथील कोर्ट क्रंमाक 2 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत कळमकर यांच्या न्यायालयात नियमित सुरू असुन प्रलंबित आहे.
विशेष म्हणजे रजनीकांत बोरेले यांनी सबळीकरणाची शासकीय जमीन वाटप करतांना आरोपी माधव वैद्य, साधना यावलकर, ओमप्रकाश जैस्वाल, नारायण कुडमथे, आकाश दत्तात्रय मारावार (घाटंजी), असलम खान व राजू महल्ले व इतरांनी शासनाची फसवणूक करून शासकीय जमीन वाटप केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत बोरेले (पांढरकवडा) यांनी केला होता.
तत्पूर्वी या प्रकरणात अगोदर पोलिस स्टेशन घाटंजी, तदनंतर पोलिस अधीक्षक यवतमाळ व इतर संबंधित विभागाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, पोलिस विभागाने लेखी तक्रारीची दखल घेतली नसल्याने बोरेले यांनी घाटंजी येथील न्यायालयात Cr.P.C. 156 (3) अंतर्गत खाजगी खटला दाखल केला. सदर प्रकरणात 27 सप्टेंबर 2005 रोजी घाटंजी येथील न्यायालयाने घाटंजी पोलिसांना तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. परंतु पोलिसांनी दाखल केलेला अहवाल योग्य नसल्याने घाटंजी न्यायालयाने पुन्हा अधिकचा तपास (FURTHER INVESTIGATION) करून अहवाल सादर करण्याचे आदेश घाटंजी पोलिसांना दिले.
घाटंजी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आरोपी समाज कल्याण अधिकारी माधव वैद्य (यवतमाळ) व सौ. साधना यावलकर यांनी फौजदारी याचीका क्रंमाक 9989/2006 (फौजदारी अर्ज क्रंमाक 3112/2006) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. मात्र, उच्च न्यायालय नागपूर खंडपिठाने सदर याचीका फेटाळली. तदनंतर आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात (नवी दिल्ली) Spl. Leave to Appeal (CRL) Nos. 7293, 7324 and 7332 of 2009 with Criminal Misc. Petition No. 17137, 16817 and 16884 दाखल केले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सदर याचीका फेटाळून लावली.
सदर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात ॲड. महेश धात्रक (नागपूर) यांनी तक्रारदार रजनीकांत बोरेले यांची बाजू मांडली. तर, याचीका कर्ता माधव वैद्य यांची बाजू ॲड. शाम देवाणी यांनी मांडली.
विशेष म्हणजे सद्यातरी घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात रजनीकांत बोरेले विरुद्ध माधव वैद्य व इतर प्रकरण RCC/223/2019 हा खटला घाटंजी येथील न्यायालय क्रंमाक 2 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत कळमकर (ए. ए. कळमकर) यांच्या न्यायालयात नियमित सुरु आहे.